Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Satara › प्रजासत्ताकदिनी कराडात सामुहिक मुंडण 

प्रजासत्ताकदिनी कराडात सामुहिक मुंडण 

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:18PMकराड : प्रतिनिधी

40 वर्षापूर्वी कण्हेर धरणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करूनही मसूर परिसरातील पाच गावात पुनर्वसन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी कराड प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली ‘सामुहिक मुंडण’ करणार असल्याचा इशारा शनिवारी देण्यात आला आहे.

कण्हेर धरणाच्या निर्मितीसाठी वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंंजळ या गावांचे पुनर्वसन कराड तालुक्यातील मसूर परिसरात करण्यात आले होते. मात्र 40 वर्ष होऊनही या गावातील ग्रामस्थांना 18 नागरी सुविधा शासनाकडून मिळालेल्या नाहीत. गावांची नोंदही महसूल दरबारी झालेली नाही. वारंवार मागणी तसेच पाठपुरावा करूनही शासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे अन्याय करत दुर्लक्षच करत आहे. ठोस निर्णय न झाल्यास पाच गावात पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त सामुहिक मुंडण करणार आहेत. तसेच ‘आमचे मायबाप सरकार आमच्यासाठी मेलेले आहे’, असे समजून दहावाही घालणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांसह स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी सांगितले आहे. प्रकल्पग्रस्तांनी मांडलेल्या समस्यांबाबत गांभिर्याने विचार करण्याचे ग्वाही यावेळी अधिकार्‍यांकडून देण्यात आली.