Mon, Nov 19, 2018 08:24होमपेज › Satara › कराड पंचायत समिती सभापतीपदी फरीदा इनामदार 

कराड पंचायत समिती सभापतीपदी फरीदा इनामदार 

Published On: Jul 03 2018 1:10PM | Last Updated: Jul 03 2018 1:09PM
कराड : प्रतिनिधी

कराड पंचायत समितीच्या सभापती उंडाळकर गटाच्या फरीदा इनामदारर यांची निवड झाली. तर उपसभापती राष्ट्रवादीचे सुहास बोराटे यांना संधी देण्यात आली आहे. मुस्लिम समाजाला पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्याची पहिली संधी उपलब्ध झाली आहे.

कराड पंचायत समितीत आमदार बाळासाहेब पाटील गटाचे सात सदस्य तर  माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाची सहा सदस्य निवडून आले होते. सत्ता स्थापनेवेळी या दोन्ही गटांनी आघाडी करून पंचायत समितीची सत्ता सव्वा सव्वा वर्षे सभापतिपद वाटून घेतले होते. पहिल्या टर्ममध्ये  आमदार पाटील गटाच्या शालन माळी यांना सभापतीपद देण्यात आले होते. उपसभापती उंडाळकर गटाची रमेश देशमुख होते. यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. 

नूतन निवडीत सभापतीपद उंडाळकर गटाच्या वाट्याला आले होते.  त्यानुसार मंगळवारी फरीदा इनामदार यांची सभापतीपदी वर्णी लागली तर आमदार बाळासाहेब पाटील गटाचे सुहास बोराटे यांना उपसभापतिपदी संधी देण्यात आली. या निवडी पुढील सव्वा वर्षासाठी आहेत. प्रांताधिकारी हिंमत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली  ही निवड प्रक्रिया पार पडली.