Mon, May 20, 2019 08:29होमपेज › Satara › अथणी शुगरविरोधात आंदोलन

अथणी शुगरविरोधात आंदोलन

Published On: Apr 15 2018 10:57PM | Last Updated: Apr 15 2018 9:49PMकराड : प्रतिनिधी

अथनी शुगरच्या रयत सहकारी साखर कारखान्यावरुन युनिटने 15 जानेवारीनंतर ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांना 1 रुपयाही बिल दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. तसेच येत्या आठवडाभरात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा मनसेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

अथनी शुगरच्या युनिटला  2017-18 सालात शेतकर्‍यांनी 4 लाख टन ऊस घातलेला आहे. मात्र यापैकी काही शेतकर्‍यांना एक रुपयाही मिळालेला नाही. संबंधित शेतकर्‍यांनी कारखान्याला ऊस बिलाची मागणी केली असता कारखान्याच्या सध्याच्या प्रशासनाने ऊस बिलापोटी अ‍ॅडव्हानस देण्याची अजब सोय उपलब्ध करून दिली आहे. 
कारखान्याकडून सांगलीततील एका पतसंस्थेला हाताशी धरण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या ऊस बिलापोटी कर्ज देऊन त्यास अ‍ॅडव्हान्स दिला जात आहे. त्यासाठी दीड हजार रुपये सभासद फी व अन्य काही रक्कम कपात केली जात आहे. त्याचबरोबर या कर्जाला शेतकर्‍यांना 15 टक्के व्याज भरावे लागत आहे. त्यामुळेच संबंधितांनी शेतकर्‍यांचे 4 ते 5 महिन्यांपासून कोट्यवधी रुपये बिनव्याजी वापरले आहेत. शेतकर्‍यांना पैसे देणे आवश्यक असताना त्यांनाच व्याज भरावे लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी होऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.