Tue, Apr 23, 2019 10:13होमपेज › Satara › कराडमध्ये मराठा भगिनींचे ठिय्या आंदोलन 

कराडमध्ये मराठा भगिनींचे ठिय्या आंदोलन 

Published On: Aug 02 2018 5:58PM | Last Updated: Aug 02 2018 5:58PMकराड : प्रतिनिधी 

येथील दत्त चौक परिसरात गुरूवारी सलग दुसर्‍या दिवशीही मराठा समाजातील भगिनींनी ठिय्‍या आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन  बुधवार दिं १ पासून कराडात मराठा भगिनींनींकडून सुरू करण्यात आले आहे. 

गुरुवारी दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक कराडचे नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक अतुल शिंदे, माजी बांधकाम सभापती नगरसेवक बाळासाहेब यादव,  नगरसेवक राजेंद्र माने, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, माजी नगरसेवक गंगाधर जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कराडमधील खते व बियाणे विक्रेत्यांनीही ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार मराठा भगिनींनी व्यक्त केला आहे.