होमपेज › Satara › कराड : पुनर्वसितांच्या हक्कासाठी स्वाभिमानी मैदानात

कराड : पुनर्वसितांच्या हक्कासाठी स्वाभिमानी मैदानात

Published On: Jan 15 2018 5:00PM | Last Updated: Jan 15 2018 5:00PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

आठवडाभरापूर्वी मसूर परिसरात कण्हेर धरणामुळे पुनर्वसन केलेल्या वाघेश्वरच्या दीड हजार ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या परिसरातील चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ, धनकवडी या गावातील पुनर्वसित ग्रामस्थही आता एकवटले आहेत. या सर्व पुनर्वसितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

वाघेश्वरसह परिसरात पुनर्वसन केलेल्या सर्व ग्रामस्थ, शेतकऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत प्रथम लोकशाही मार्गाने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधणार आहोत, मात्र त्यानंतरही पुनर्वसितांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा नलवडे यांनी दिला आहे.