Fri, Apr 26, 2019 03:49होमपेज › Satara › कराड कस्तुरी सभासदांसाठी हळदी-कुंकू समारंभ

कराड कस्तुरी सभासदांसाठी हळदी-कुंकू समारंभ

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:20PMकराड : प्रतिनिधी 

गोड बोलणे, आदरातिथ्य करणे ही भारतीय संस्कृती आहे. त्यातही गोडधोड खाऊ घालण्याची भारतीय परंपरा सणांद्वारे द्विगुणित केली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीस तिळगुळ देवून गोड बोलण्याचा आग्रह केला जातो. याच दिवशी महिलांसाठी हळदˆ कुंकू हा सणही होतो.याच संक्रांतीचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या सदस्या महिलांसाठी मंगळवार दि. 23 रोजी हळद कुंकू समारंभ व वाण वाटप करण्यात येणार आहे. 

येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये दुपारी 4 ते 7 यावेळेत कार्यक्रम होणार आहे. यावेळी सदस्या महिलांसाठी सुवर्णस्पर्श जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी यांच्याकडून हळदीकुंकू वाण म्हणून गोल्ड प्लेटेड दोन बांगड्या देण्यात येणार आहेत. यावेळी राजेश खन्ना यांच्या सदाबहार गाण्यांचा ‘राजेश खन्ना हिट्स’ हा ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रमाचे आयोजन खास कस्तुरी सभासदांसाठी केले आहे. असिफ बागवान, मोहंमंद अनिस, कविता आगरवाल, प्रमोद सावंत या कार्यक्रमाचे कलाकार असून युरोसर्जन डॉ.रविंद्र अगरवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी 8805023653 यांच्याशी संपर्क साधावा.