Sat, Nov 17, 2018 14:52होमपेज › Satara › कराडमध्ये फक्त महिलांसाठी लावणी 

कराडमध्ये फक्त महिलांसाठी लावणी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

दै. पुढारीच्या कस्तुरी क्लबच्या महिला सभासदांसाठी अगदी वेगळी अशी नाविण्यपूर्ण मेजवाणी कराडमध्ये आयोजित केली असून फक्त महिलांसाठी ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 
बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वा. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊनहॉल), कराड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. स्टुडिओˆ11 सलुन अ‍ॅण्ड स्पा, कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्था प्रायोजक आहेत.

या नव्या वर्षामध्ये कस्तुरी क्लबच्या महिला सदस्यांकरीता विविध कार्यक्रमांची मेजवाणी दिली जाणार असून याशिवाय सहभागी शॉपकडून भरघोस डिस्काऊंट खास सभासदांकरीता दिली जाणार आहेत. याशिवाय कस्तुरींच्या सभासदांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये लावणी महोत्सव, विविध कलाकारांच्या भेटी, संक्रातीचे वाण, गौरी गणपती स्पर्धा, पर्यटनस्थळी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

या वर्षीची सभासद नोंदणी सध्या सुरू असून मर्यादित नोंदणी असल्याने इच्छूक महिलांनी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 संपर्क साधा. कार्यक्रमाच्या ठिकाणी नाव नोंदणी सुरू आहे.