होमपेज › Satara › कराड पालिका सभापती निवडी बिनविरोध

कराड पालिका सभापती निवडी बिनविरोध

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:05PM

बुकमार्क करा
कराड ः प्रतिनिधी

विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी कोणाला कोणते सभापतीपद मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सर्व  समित्यांच्या सभापतीपदी नव्यांना  संधी देत सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या. महत्वाच्या समजल्या जाणार्‍या बांधकाम समिती सभापतीपदी हणमंत पवार  यांची निवड करण्यात आली.  निवडणुकीचा कार्यक्रम प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी हिम्मत खराडे यांनी जाहीर केला. यावेळी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उपस्थिती होती.  पाणी पुरवठा समितीच्या सौ. अरूणा भोसले, नियोजन समिती सभापतीपदी सौ. कश्मिरा इंगवले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आशा मुळे तर उपसभापती सौ. माया भोसले, आरोग्य समितीच्या सभापतीपदी  प्रियांका यादव यांची निवड बिनविरोध निवड झाली.

तर महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या स्थायी समितीवर रोहिणी शिंदे, जयवंत पाटील, शारदा जाधव, राजेंद्र यादव, विनायक पावसकर, हणमंत पवार, अरूणा पाटील, प्रियांका यादव, आशा मुळे, कश्मिरा इंगवले यांची निवड झाली.  दुपारी बारा वाजेपर्यंत जनशक्ती, भाजपा व लोकशाही आघाडीकडून  समर्थक नगरसेवकांची सभापती, सदस्यपदाची नावे मुख्याधिकार्‍यांसह हिम्मत खराडे यांच्याकडे विनंती अर्जाद्वारे देण्यात आली. सभापतीपदासाठीही प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने साडेबाराच्या सुमारास सर्व सभापतींच्या नावांची घोषणा खराडे यांनी केली.

बांधकाम समितीच्या सदस्यपदी  सदाशिव यादव, राजेंद्र माने, विजय वाटेगावकर, महेश कांबळे, विनायक पावसकर, सुहास जगताप, सौ. अनिता पवार यांची निवड करण्यात आली.  स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यपदी विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, अतुल शिंदे, सौ. अंजली कुंभार, सौरभ पाटील यांची निवड झाली.  तर नियोजन आणि विकास समिती सदस्यपदी सौ. माया भोसले, सदाशिव यादव, किरण पाटील, अर्चना ढेकळे, मिनाज पटवेकर, इंद्रजित गुजर, सौ. पल्लवी पवार यांची निवड झाली.  शिक्षण समितीच्या सदस्यपदी अतुल शिंदे, स्मिता हुलवान, अर्चना ढेकळे, सुप्रिया खराडे, सुहास जगताप, मिनाज पटवेकर, वैभव हिंगमिरे यांची निवड झाली.  पाणीपुरवठा व जल:निसारण सदस्यपदी शारदा जाधव, गजेंद्र कांबळे, सुप्रिया खराडे, महेश कांबळे, सुहास जगताप, इंद्रजित गुजर, मोहसिन आंबेकरी यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी माया भोसले, अर्चना ढेकळे, स्मिता हुलवान, शारदा जाधव, अंजली कुंभार, विद्या पावसकर, सुनंदा शिंदे यांची निवड करण्यात आली.