Sun, Jul 21, 2019 12:32होमपेज › Satara › वक्‍तृत्वाने सर्वांना विचार करायला लावणारा चिमुरडा

वक्‍तृत्वाने सर्वांना विचार करायला लावणारा चिमुरडा

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 8:44PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनीधी

वक्‍तृत्व कौशल्यामुळे भल्याभल्यांना तोंडात बोट घालायला लावणार्‍या रेहान नदाफ या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडा कराड नगरपालिकेचे स्वच्छता दूत म्हणून काम करत स्वच्छतेचे महत्व सांगत आहे. खेळण्या बागडण्याच्या वयातच आपल्या वक्‍तृत्व शैलीच्या जोरावर अनेक व्यासपीठे गाजवत असलेल्या बालवक्ता रेहान नदाफची ख्याती आता सर्वदूर पोहचली आहे.  बालवक्ता म्हणून अनेक 

गौरवपुरस्कार प्राप्त त्यांने केले आहेत. मोठमोठ्या कार्यक्रमात हा चिमुकला उपस्थितांना सध्या प्रबोधन करत आहे.कराड शहराने स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यासाठी स्वच्छता दूत म्हणून रेहान नदाफ याची निवड पालिकेकडून करण्यात आली आहे.  येथे नुकत्याच झालेल्या कन्या शाळेत त्याने आपल्या वक्‍तृत्वाची छाप टाकत अनेकांची मने जिंकली.   विजय दिवस कार्यक्रमातही त्याने शौर्याची गाथा गाऊन आपल्या वकृत्वाने नागरिकांना मोहिनी पाडली होती. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते त्याचा सन्मान झाला. त्याच्या भाषणाच्या क्लीप सोशल मिडीयावर चांगल्याच चर्चेच्या ठरल्या आहेत. 

रेहानचे मुळ गाव (कोळे ता. कराड) आहे. वडिलांच्या छायाचित्रण व्यवसायमुळे तो सध्या कोल्हापूर जिल्ह्यात उजळाईवाडी (ता. करवीर) येथे राहतो आहे. विधीसेवा प्राधिकरण कोल्हापूर जिल्ह्याचा तो ब्रँड अम्बसीडर आहे. तेथील प्ले इंग्लिश स्कूलमध्ये तो शिक्षण घेत आहे. बालवक्ता म्हणून त्याच्या ख्याती विविध जिल्ह्यात पसरली आहे. छत्रपती  शिवाजी महाराज, शाहू महाराज, महत्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महाराष्ट्राचे स्वरराज छोटा गंधर्व, आदी थोर पुरूषाचे जीवनचारित्र्य त्याने अवगत केली असून त्यावर वक्तृत्व तो करत आहे. तसेच शासनाच्या जनजागृतीपर कार्यक्रमात प्रबोधन करून खारीचा वाटा उचलत आहे. वडील शकील नदाफ आई आफसाना यांचे मार्गदर्शन त्यास मिळत आहे. मराठा क्रांन्ती मोर्चातही त्याने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.