Mon, Sep 24, 2018 23:44होमपेज › Satara › पशूपक्षांपासून पिकांचे संरक्षण करणारी इकोफ्रेंडली ‘शेतकरी गन’ 

पशूपक्षांपासून पिकांचे संरक्षण करणारी इकोफ्रेंडली ‘शेतकरी गन’ 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

उत्तर कोपर्डे ता. कराड येथील रहिवाशी आणि सद्या अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे आटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या जीवन पवार याने आपल्या संशोधनातून तयार केलेल्या ‘शेतकरी गन’ कृषी प्रदर्शनात  आकर्षण ठरली.

‘शेतकरी गन’ माकडे, हरीण, डुकरे, पाखरे या पिकांची नासाडी करणार्‍या सर्वच पशूपक्षांना हाकलून लावण्यास मदत करते. पशूपक्षांना कोणतीही इजा न करता ईकोफ्रेंडली पध्दतीने काम करते.  किसान पीव्हीसी मटेरीयलपासून बनवलेली आणि वजनाने अतिशय हलकी असणारी ही गन गुड मॉर्निंग ऑडि डिओड्रंट स्प्रेवर देखील काम करते. गन हाताळण्यासाठी कोणत्याही लायसन्सची गरज लागत नाही. बार भरणेसाठी बटाटा, कांदा, लिंबू आणि भाजीपाला कशाचाही उपयोग करता येतो. याशिवाय शुभप्रसंगी गुलाल आणी फुलांची उधळण सुध्दा करता येेते. कराड बाजार समिती आणि स्मार्ट एक्स्पो ग्रुपने जीवनला प्रदर्शनात मोफत स्टॉल दिला होता.