Mon, Feb 18, 2019 20:49होमपेज › Satara ›  डॉ. द. शि. एरम, सुभाषराव जोशी यांच्या पुतळ्याचे अनावरण

 डॉ. द. शि. एरम, सुभाषराव जोशी यांच्या पुतळ्याचे अनावरण

Published On: Jan 28 2018 7:34PM | Last Updated: Jan 28 2018 7:34PMकराड : प्रतिनिधी 

अर्थकारणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक म्हणून नावलौकिक असणाऱ्या कराड अर्बन कुटुंब जनक स्व. डॉ. दत्तात्रय शिवराम एरम आणि अर्बंन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण रविवारी सायंकाळी कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते झाले. 

कराड अर्बंन बँकेंच्या शताब्दी सोहळ्याची सांगता रविवारी डॉ. बालाजी तांबे यांच्या उपस्थितीत झाली. तत्पूर्वी कराड अर्बंन कुटुंब जनक स्व. डॉ. दत्तात्रय शिवराम एरम व अर्बंन कुटूंब प्रमुख डॉ. सुभाषराव जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण झाले. यावेळी सुभाषराव जोशी यांच्यासह बँकेंचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, दिलीपराव जाधव, ऍड. संभाजीराव मोहिते, डॉ. अनिल लाहोटी यांच्यासह सर्व संचालक, कराड अर्बंन बझारचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक मंडळ यांच्यासह कराड अर्बंन बँकेंचे सर्व शाखाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.