Wed, Oct 16, 2019 18:23होमपेज › Satara › कराडात बीएसएनएलचे कर्मचारी संपावर 

कराडात बीएसएनएलचे कर्मचारी संपावर 

Published On: Dec 12 2017 1:47PM | Last Updated: Dec 12 2017 1:47PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

देशभरातील तब्बल 65 हजार मोबाईल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्याच्या निर्णयाला बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध करत दोन दिवस संप पुकारला आहे. या देशव्यापी संपास पाठिंबा देत कराडमधील बीएसएनएलचे 100 हून अधिक कर्मचारी, अधिकारी संपावर गेले आहेत.

12 आणि 13 डिसेंबरला हा संप करण्यात येणार आहे. मंगळवारी कराडमध्ये संपामुळे बीएसएनएलचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करून खाजगी मोबाईल कंपन्यांचे भले करत बीएसएनएलला खिळखिळीत करण्याचा डाव आखला जात असल्याचाही आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. टॉवरची उपकंपनी करण्याचा निर्णय सरकारने मागे घेत तिसरा वेतन करार लागू करावा, अशी मागणीही आंदोलन कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कराडमध्ये सकाळी दहाच्या सुमारास काहीकाळ कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत कामगार विरोधी व खाजगी कंपनी धार्जिण्या धोरणाचा निषेध नोंदवला.