Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Satara › ‘त्यांच्या’मुळे बँकेला १ कोटीचा फायदा

‘त्यांच्या’मुळे बँकेला १ कोटीचा फायदा

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 10:38PMकराड : प्रतिनिधी 

कराड अर्बन बँकेबाबत हेतूपूर्वक अफवा पसरवल्या गेल्या. मात्र त्यामुळे बँकेला तब्बल 1 कोटी 20 लाखांचा नफाच झाला आहे. बँकेंच्या 75 हजार सभासदांपैकी ज्यांचा स्वार्थ दुखावला गेला आहे, असे केवळ 9 लोकच अफवा पसरवत असल्याचा टोला लगावत संबंधितांना बँकेंत येऊन माहिती घेण्याचे आवाहनही कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी सांगितले.

दि कराड अर्बन को - अ‍ॅप बँकेंच्या 101 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बँकेंचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

सुभाषराव जोशी म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून बँकेंच्या आर्थिक स्थितीबाबत काहीजण अफवा पसरवत आहेत. अनेकांनी आम्हाला या अफवांबाबत खुलासा करावा, असा सल्ला दिला होता. मात्र या सर्वांमागे कोण आहे ? हे शोधण्यासाठीच आम्ही गप्प होतो. कोणाला संचालक केले नाही,  कोणाला कर्जात सूट दिली नाही, म्हणून असे लोकच अफवा पसरवण्यात आघाडीवर आहेत. या अफवांवर विश्‍वास ठेवत काही लोकांनी मुदतीपूर्वीच ठेवी काढल्या. त्यामुळे संबंधित ठेवीदारांचाच तोटा झाला आहे. मात्र यामुळे बँकेंला 1 कोटी 20 लाखांचा नफाच झाला आहे.  

ज्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवला, त्यांना सत्य परिस्थिती माहिती झाल्यावर अनेकांनी पुन्हा ठेवी बँकेंत ठेवल्या आहेत, असे सांगत सरकारच्या धोरणानुसार 450 कोटींच्या अन्य संस्थांच्या ठेवी आपण परत केल्या आहेत. मात्र याबाबतही अपप्रचार केला गेला. सध्यस्थिती ठेवी वाढण्याबरोबर कर्जाचा रेषोही 68 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. बँक संपवण्याची भाषा करणारेच संपतील, असा इशारा देत बँकेंत न येता बँकेंला बदनाम करू नका, असे आवाहनही जोशी यांनी यावेळी केले.
डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, 1982 साली 11 कोटींचा असणारा बँकेंचा व्यवसाय आज 4 हजार 600 कोटीहून अधिक झाला आहे. गेल्यावर्षी अजिंक्यतारा सहकारी व अजिंक्यतारा महिला सहकारी बँक या बँकांचे विलीनीकरण आपल्या बँकेंत करण्यात आले. त्यामुळे बँकेंच्या व्यवसायात 200 कोटींची वाढ झाली आहे. तर बँकेंच्या विस्तार भर पडून 62 शाखा झाल्या आहेत. बँकेंचा स्वनिधी 333.62 कोटी असून 1216.13 कोटींची गुंतवणूक बँकेंने केली आहे. बँकेंचे एकूण उत्पन्न 336.41 कोटी असल्याचेही डॉ. एरम यांनी यावेळी सांगितले.

सभासद हिताला बांधिल रहात पारदर्शक कारभार केला जातो.बँकेंची चालू आर्थिक वर्षातील वाटचाल संमिश्र राहिली आहे. स्व. डॉ. द. शि. एरम आणि कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साथीने तीन दशकांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक विचारधारेतून वाटचाल करत अनेक असाध्य वाटणारी ध्येय आपण सहजपणे गाठली आहेत. ज्ञानी व अनुभव संपन्न कर्मचारी यांचाही बँकेंच्या प्रगतीत मोठा वाटा असल्याचेही डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले. प्रारंभी मागील वार्षिक सभेचा वृत्तांत कायम करण्यात आला. तसेच सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी मान्यता दिली. काही सभासदांनी आक्षेप नोंदवण्याचा केलेला प्रयत्न वगळता सभेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी सूत्रसंचालन केले.