Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Satara › एसटीतून 80 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

एसटीतून 80 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 10:29PMकराड : प्रतिनिधी

पुणे ते कराड दरम्यान एसटीतून प्रवास करत असताना महिलेजवळ असलेल्या पिशवीतील अंदाजे 80 हजार रुपयांचे सुमारे चार तोळ्यांचे दागिने चोरट्याने लंपास केले. मंगळवार दि. 13 रोजी ही घटना घडली. सौ. माया संजय कोरे (वय 50, रा. विटा, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, माया कोरे या पती संजय कोरे यांच्यासह मंगळवारी दुपारी पुणे येथून स्वारगेट-इचलकरंजी या एसटीने कराडला येत होत्या. यावेळी त्यांनी आपल्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये गळ्यातील सोन्याचा हार, कर्णफुले व सोने खरेदी केलेली पावती ठेवली होती. दरम्यान, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कराडमध्ये उतरल्यानंतर पिशवीत पाहिले असता त्यामध्ये दागिने नसल्याचे लक्षात आले. परंतु, विटा एसटी लागली असल्याने गडबडीत संबंधित महिला पतीसह त्या एसटीत जाऊन बसली. घरी जाऊन पुन्हा खात्री केली असता त्यांना आपल्याजवळील दागिण्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी कराडमध्ये येऊन फिर्याद दिली.