Sun, Jul 05, 2020 06:36होमपेज › Satara › जावली : घरगुती गॅस बेकायदेशीर ट्रान्स्फर करताना दोघांना अटक

जावली : घरगुती गॅस बेकायदेशीर ट्रान्स्फर करताना दोघांना अटक

Published On: Dec 21 2017 5:56PM | Last Updated: Dec 21 2017 5:56PM

बुकमार्क करा

सावली : वार्ताहर 

घरगुती गॅस वितरणाच्या गाडीमधुन बेकायदेशीरपणे सिलबंद सिलेंडरमधील गॅस मोकळ्या गॅसमध्ये भरताना दोघांना अटक करण्यात आली.

ही घटना मोरघर ता. जावली येथे मेरुलिंग मोरघर रस्त्यावर एका गॅस एजन्सीची  गॅस वितरण करणारी गाडी आहे. गुरुवारी एमएच 11 बीएल  6543 या गाडीतील सीलबंद असणार्‍या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस टाकीमधे गॅस भरण्याचे काम सुरू होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकानी जात गॅस वितरण करणाऱ्या ड्रायव्हर व क्लिनर यांना रंगेहात पकडले. शेखर सुरेश माने (शिवथर) व नितीन सुरेश साबळे (शिवथर) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई मेढा पोलिस स्टेशनच्या जीवन माने यांनी केली .