सातारा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या कुठून आल्या? या गोळ्या कोणत्या मेडिकलमधून घेतल्या? याची चौकशी सध्या एलसीबीकडून सुरू आहे. संबंधित पीडित मुलीकडून या गोळ्या कोणाकडून घेतल्या याची माहिती मिळाल्यास या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक करता येणार आहे.
दि. 23 रोजी गर्भपात औषधाचा साठा केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला. याठिकाणी एमटीपी किटसह गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सातारा तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या हे तपासात निष्पन्न झाले आहे. या गोळ्या कोणी दिल्या? ही औषधे कोठून आली? कोणत्या मेडिकल वाल्याने याची विक्री केली? या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. सोमवारी पीडित मुलीचा जबाब घेऊन एलसीबी कारवाई करणार आहे.
या प्रकरणामुळे सातार्यातील मेडिकलवाल्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. संशयाची सुई आपल्यावर फिरू नये यासाठी गेल्या आठवडाभरापासून काही मेडिकलवाले पसार झाले आहे. या प्रकरणात पहिला संशयित हा मेडिकल चालवणाराच असल्याने मेडिकल वाले घाबरले आहे. त्यातच पीडित मुलगी कोणत्या मेडिकलचे नाव घेईल हे सांगता येत नसल्याने ही औषधे विक्री करणारे मेडिकल चालक पसार झाले आहे. आता एलसीबी हे प्रकरण कसे हाताळते याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
Tags : satara, satara news, abortion medicine, medical owners, inquiry,
May 06 2018 1:11AM
May 06 2018 1:11AM
May 06 2018 1:11AM
May 06 2018 1:11AM
May 06 2018 1:11AM
May 06 2018 1:11AM