Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Satara › साताऱ्यात बाईकर्सच्या धडकेत एक ठार

साताऱ्यात बाईकर्सच्या धडकेत एक ठार

Published On: Jun 25 2018 2:59PM | Last Updated: Jun 25 2018 2:59PMसातारा : प्रतिनिधी

सातारा वाहतूक पोलीस विभागासमोर रविवारी रात्री पाठीमागून आलेल्या धूम बाईकर्सच्या धडकेत राजन चंपकलाल शहा (वय 50, रा. प्रतापगंज पेठ) हे ठार झाले. दरम्यान, धूम बाईकर्सच्या धडकेत एकाला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजन शहा दुचाकीवरून पवई नाक्याकडे निघाले होते. रात्री दहा वाजता पाठीमागून आलेल्या धूम बाईकर्सने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की राजन शहा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. धूम बाईकर्स वेडीवाकडी वळणे घेत असताना शहा यांना धडक बसलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, राजन शहा यांचे मेडिकल असून जोतिषचतज्ज्ञ प्रा. रमणलाल शाह यांचे ते पुतणे आहेत.