Sun, Jul 21, 2019 10:40होमपेज › Satara › लैंगिक अत्याचार करून क्रांतीचा खून ; तिघे ताब्यात

लैंगिक अत्याचार करून क्रांतीचा खून ; तिघे ताब्यात

Published On: Mar 23 2018 11:09PM | Last Updated: Mar 23 2018 11:09PMखटाव : प्रतिनिधी 

नेर ता. खटाव येथील दुसरीत शिकणारी क्रांती विजय शिर्के ( वय 8 ) ही मुलगी सायं 5 च्या सुमारास तिच्या राहत्या घराच्या अंगणातुन बेपत्ता झाली होती. आज सकाळी तिचा मृतदेह गावालगतच्या  मळा नावाच्या शिवारातील विहीरीत आढळून आले. लैगीक अत्याचार करुन क्रांतीचा खून करण्यात आल्याच्या संशयावरुन या प्रकरणी पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले असूनतपास कामी अडथळा येऊ नयेत यासाठी आरोपींची नावे जाहीर केली नसल्याचे तसेच लैंगीक अत्त्याचार करुन मुलींचा खून करणे, पुरावा नष्ट करणे, लहान मुलांचा लैंगीक छळ ( पोक्सो ) आदी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले

पुसेगाव पोलिस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल  झाला आहे. नेर ता. खटाव येथील क्रांती विजय शिर्के ही दुसरीत शिकणारी मुलगी बुधवारी ( ता. 21 )संध्याकाळी पाचच्या खेळता खेळता राहत्या घरासमोरुन अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल  दाखल झाला होता. या मुलीच्या तपासासाठी नेर  गावतील अबाल वृध्द यांनी त्या रात्रि सर्वत्र शोधाशोध केली  व मुलीच्या कुटूंबियांना धीर देऊन क्रांतीच्या शोधासाठीआजूबाजूचा सारा परिसर पिंजून काढला. पहाटे पाच वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. शिवाय दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाच्या साह्याने शोध घेण्यात आला. परंतु तिचा शोध लागला नाही. आज सकाळी गावा लगत असलेल्या मळा नावाच्या शिवारातील विहीरीत क्रांतीचे प्रेत आढळून आले. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्या नंतर प्रेत मुलीच्या पालकांच्या ताब्यात न देता फॉरेन्सीक एव्ही़न्स गोळा करण्यासाठी ते सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. मुंबई येथून फॉरेन्सीक एक्स्पर्ट पथकाद्वारे सातारा येथे येऊन तपासणी झाल्यानंतर प्रेत पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.  लैंगीक अत्त्याचार करुन मुलींचा खून करणे, पुरावा नष्ट करणे, लहान मुलांचा लैंगीक छळ ( पोक्सो ) आदी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार, परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बनसोड, कोरेगाव उपविभागातच्या पोलिस उपअधिकारी प्रेरणा कट्टे, स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

Tags : satara, satara news, sexually harassed, brutally murdered, kranti, 8 year old school girl, crime, child sexual harassment