Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Satara › जावळीकरांचे स्वच्छतेतून गाडगे महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)

जावळीकरांचे स्वच्छतेतून गाडगे महाराजांना अभिवादन (व्हिडिओ)

Published On: Dec 19 2017 2:41PM | Last Updated: Dec 19 2017 3:39PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

 संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त मंगळवारी  जावळीतील नागरिकांनी स्वच्छता मोहिम राबवली.  जावळी तालुक्यातील महाराजा शिवाजी हायस्कूल मधील  मुलांसह,  जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी सारा गावच झाडू हातात घेऊन लोटून काढून अभिवादन केले.

संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त  जावळी तालुक्यातील कुडाळ येथे  विद्यार्थ्यांच्यावतीने मंगळवारी  गावातून  स्वच्छता फेरी काढली. त्यानंतर  सारा गाव झाडूने लोटून  स्वच्छता करण्यात आली.  कुडाळच्या विद्यार्थ्यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रापासून  स्वछतेची सुरवात करून ग्रामपंचायत परिसर साफ केला. तसेच कुडाळचा प्रत्येक चौक, ग्रामदैवत परिसर,  कुडाळ  बसस्थानक  परिसराची स्वच्छता केली.

 यावेळी बोलताना सरपंच  कुडाळ वीरेंद्र शिंदे, जेष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष भाऊराव शेवते,  मनोज वंजारी , महेश पवार , सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ विध्यार्थी , शिक्षक  उपस्थित  होते.

व्हिडिओ :  इम्तियाज मुजावर