Fri, May 24, 2019 21:28होमपेज › Satara › महसूल कर्मचाऱ्यांना वाळु तस्कारांची मारहाण 

महसूल कर्मचाऱ्यांना वाळु तस्कारांची मारहाण 

Published On: Jul 30 2018 2:52PM | Last Updated: Jul 30 2018 2:52PMतासवडे : वार्ताहर 

कराडमधील इंदोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला होता. हा डंपर घेऊन येताना डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच या दरम्यान चालक आणि त्याच्या साथीदाराने महसूल  मारहाण केली. 

इदोंली ता. कराड येथे अवैधरित्या  वाळू वाहतूक करणारा डंपर क्रं . एमएच - १० - २१५५ हा   महसूलच्या विभागाचे कर्मचारी मकंरद साळुंखे आणि लिपीक संतोष गुलाणी  यांनी पकडला. सदरचा डंपर हा कराड तहसिलदार कार्यालयात घेऊन येत असताना डंपर चालकाने डंपर अचानक महामार्गवरून सर्व्हिस रोडवर घेत परत फिरून उंब्रजच्या दिशेने पळून जाऊ लागला. त्यावेळी महसुल आधिका-यांनी वाळू भरलेल्या डंपरचा बेलवडे हवेली पर्यंत पाठलाग करून पकडला. त्यावेळी  डंपर मधील चालक आणि त्याठीकाणी बुलेटवरून आलेल्या  त्याच्या  तीन ते चार  साथीदारांनी महसुल आधिका-यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या हातातील मोबाईल काढून घेत मोबाईलमधील डंपरचे फोटो व रेकॉर्ड डीलीट केले.   त्याच वेळी तहसिलदार साहेबांची गाडी त्याठिकाणी आली. मारहाण करणाऱ्यानी तहसिलदार अधिकाऱ्यांची गाडी बघताच बुलेट जागीच सोडून डंपर घेऊन पळ काढला. 

दरम्यान,  कराड तालुका महसूल व तलाठी सघंटनेने या मारहाणीचा विरोध करत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.