Tue, Nov 13, 2018 21:25



होमपेज › Satara › सातार्‍यात गांजा जप्तीवेळी अंगावर सोडले कुत्रे; पोलिस जखमी

सातार्‍यात गांजा जप्तीवेळी अंगावर सोडले कुत्रे; पोलिस जखमी

Published On: Jan 05 2018 8:26PM | Last Updated: Jan 05 2018 8:26PM

बुकमार्क करा




सातारा : प्रतिनिधी

सदरबझार येथील आमनेवाडाच्या पाठीमागे घरालगत सुमारे दीड किलो वजनाचे गांजाचे झाडे जप्त करत असताना संशयित महिलेने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका पोलिसाला कुत्र्याने चावा घेतला आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

वसीम इलियास शेख (वय २७)व शहजादी शेख (दोघे रा.सदरबझार) अशी संशियत पती-पत्नीचे नावे आहेत. पोलिस हवालदार किशोर तारळकर असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, पोलिस हवालदार राहुल खाडे यांनी याबाबतची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे गांजाचे झाडे असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांचे पथक करून घटनास्थळी छापा टाकला असता आमनेवाडा पाठीमागे गांजाचे झाड निदर्शनास आले. वसीम शेख याच्या घरालगत गांजाचे झाड सुस्थितीत होते. या झाडाला पाणी, खत घातले असून ते पडू नये यासाठी वायरीने बांधलेलेही होते. यावरुनच हे झाड जगवल्याचे पोलिसांची खात्री झाली.

पोलिसांची चाहूल लागताच संशयित वसीम याने घटनास्थळावरुन पळ काढला. वसीमची पत्नी शहजादी घटनास्थळी होती. गांजाच्या झाडाबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना त्या महिलेने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली व त्याचवेळी तारळकर या पोलिसाला कुत्र्याने चावा घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गांजाचे झाड जप्त केले व पोलिस ठाण्यात आणले.