Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Satara › क्लोज मटका झाला ओपन 

क्लोज मटका झाला ओपन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उंडाळे : प्रतिनिधी

कराड तालुक्यात सधन गावे म्हणून ओळख असलेल्या शेरे शेणोली सह विभागात  ओपण आणि  क्लोज मटका  चांगलाच फर्मात चालला असून लाखो रूपयाची उलाढाली बरोबर  वरीष्ठाचे उखळ पांढरे करणार्‍या व अनेकांची घरे व कुटुंबे  उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या  आशिर्वादावर सुरू आहे ? याची चर्चा  कृष्णा काठावर जोरदार सुरू आहे. तो तक्रारीनंतरही सुरू असून तो  बंद होणार का? की त्याचा विस्तार वाढणार याचीच चर्चा शेणोली शेरे दुशेरे गोंदी कार्वे वडगाव सह परिसरात सुरू आहे.

शेणोली स्टेशन व परिसरात सध्या मटका तेजीत असून चार  ते पाच मटका घेतला जातो या मध्ये संजयनगर, बस स्टॅड ,जिल्हा बॅक , यासह चार  ते पाच ठिकाणी सुरू असून दररोजची उलाढाल दोन ते अडीच लाख रूपये आहे  हा मटका गेल्या काही वर्षापासून सुरू असून त्यावर कोणाचेही निर्बध नाही  त्यामुळे त्याची व्याप्ती कमी होण्याऐवजी वाढत आहे. पूर्वी ह्या व्यवसायात  ठराविक लोक असायचे पण आता युवा पिढीही यामध्ये शिरकाव करू लागल्याने  ती बरबाद होण्याची भीती पालकां मधून होत आहे.

मटका  तेजीत राहिल्याने दररोज काही युवक या व्यवसायात शिरकाव करत असल्याने तरूण बिघडत चालला असून  हे तरूण मटक्या नंतर दारूकडे  वळतो आणि दारू व मटका हे तरूणांचे समिकरण बनले आहे व हेच तरूण  आपल्या कुटुंबीयांना त्रास देत आहेत.  दिवसातून  दुपारी फुटणारा आकडा आणि  आणि  तो आपल्याला लागावा यासाठी तासन्तास  आकडे मोडीचे गणित करणारे या व्यवसायातील  तज्ञ मान  मोडून यामध्ये इतके दंग असतात की त्यांना तहान भूक ही राहत नाही.  

कृष्णा काठावरील मटक्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून  मटक्यासाठी  अनेक  कुटुंबात .कौटुंबिक कलह वाढले असून हे असेच सुरु राहिले तर अनेक  कुटुंबे या मटक्यामुळे  बरबाद  होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. हा मटका  तातडीने बंद करावा अन्यथा जनतेला या धंद्या विरुध्द एल्गार पुकारला जाईल असा इशारा विभागातील मान्यवर पदाधिकारी यांनी  दिला असून लवकरच जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील  व विषेश पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील  यांचेकडे प्रसंगी निवेदनाद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून याचेंकडे करणार असल्याचे अनेकांनी सांगितले.

आज काय? याबाबत औत्सुक्य...

मटका ओपण की क्लोज केव्हा असतो हे यामध्ये माहिती नसणार्‍या मंडळी कडूनही अनेकदा आज काय?याबाबत औत्सुक्य राहते.  मित्राला आकडा लागला की दुसरे मित्र पार्टी घेतात.त्यामुळे आलेले पैसे पार्टीतच संपवून नशिबवान मात्र मोकळाच असतो  व नव्या दिवसासाठी घरातील वस्तू किंवा जिन्नस विक्री करतात प्रसंगी जागेवर बसून जमीन विक्रीचे व्यवहार करतात यावेळी संबधिताना कशाचेही भान नसते.