होमपेज › Satara › सातारा : मुलाचा आईसह पत्‍नीवर हल्‍ला, पत्‍नीचा मृत्‍यू  

मुलाचा आईसह पत्‍नीवर हल्‍ला, पत्‍नीचा मृत्‍यू  

Published On: Jun 30 2018 12:24PM | Last Updated: Jun 30 2018 12:24PMउंब्रज (जि. सातारा) : प्रतिनिधी

घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आई आणि पत्‍नीला चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी मोहिणी सागर घोरपडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सागर सदाशिव घोरपडे आणि आई कल्पना हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितनुसार, कराड तालुक्यातील वराडे येथे सागर घोरपडे (वय ४०) हे पत्नी मोहिनी (३२) आणि आई कल्पना (५८) यांच्यासमवेत राहतो. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही कराड येथील रुग्णालयात हलविले. मात्र, मोहिनीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कल्‍पना आणि सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. या घटनेची तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.