होमपेज › Satara › कराड :  हॉटेलमधील स्फोटाने  कराड हादरले (व्‍हिडिओ)

कराड :  हॉटेलमधील स्फोटाने  कराड हादरले (व्‍हिडिओ)

Published On: Feb 19 2018 9:33AM | Last Updated: Feb 19 2018 9:33AMकराड : प्रतिनिधी

कराडमधील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जाणाऱ्या चावडी चौकातील बसवेश्वर कॉम्पलेक्समधील स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास  जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे चावडी चौक परिसरातील सुमारे 10 ते 12 दुकानाच्या,  तसेच अनेक घरांच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहेत. या घटनेत लाखो रूपयाचे नुकसान झाले असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळी सहाच्या सुमारास  स्फोट झाल्यानंतर कराडमधील शनिवार पेठ, कन्या शाळा, सोमवार पेठ या परिसरात लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. स्वप्नील रेस्टॉरंटलगतच्या पार्श्वनाथ बँक, व्होडाफोन स्टोअरच्या काचा, स्वामी समर्थ दवाखान्याचे शटर तसेच अन्य साहित्य,  बहार ब्युटी पार्लर तसेच परिसरातील अन्य सात ते आठ दुकानांचे शटर, साहित्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.