Mon, Jul 22, 2019 04:53होमपेज › Satara › सातारा : जेवण आहे का? विचारत ढाबा मालकाचे अपहरण 

सातारा : जेवण आहे का? विचारत ढाबा मालकाचे अपहरण 

Published On: Feb 21 2018 3:08PM | Last Updated: Feb 21 2018 3:08PMकराड : प्रतिनिधी

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत वारूंजी (ता. कराड) गावच्या हद्दीत असणाऱ्या समर्थ पाटील या ढाब्याच्या मालकाचे चौघा अनोळखी संशयितांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. विक्रम कृष्णा करांडे (रा. कोडोली, ता. कराड) असे त्या मालकाचे नाव असून बुधवार दुपारपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात चौघा अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी धैर्यशिल दत्तात्रय जगताप (रा. लक्ष्मीनगर, गोळेश्वर) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. साडेअकराच्या सुमारास एक पाढऱ्या रंगाची चारचाकी गाडी त्याठिकाणी आली. जेवण आहे का? अशी विचारणा करत गाडीतील चौघांनी करांडे यांना गाडीजवळ बोलावून घेतले. करांडे गाडीजवळ जाताच एकाने त्यांच्या डोक्यात काहीतरी मारत बळजबरीने त्यांना गाडीत बसवून उंब्रजच्या दिशेने पलयान केल्याचे जगताप यांनी पोलिासांना सांगितले आहे.