Tue, Mar 19, 2019 20:46



होमपेज › Satara › घोड्याची मसाज करण्याचे तेल पिल्याने चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

मसाज करण्याचे तेल पिल्याने चिमुरड्याचा मृत्यू

Published On: Apr 27 2018 12:49PM | Last Updated: Apr 27 2018 12:49PM



महाबळेश्वर : वार्ताहर

खेळता खेळता बाटलीतील पाणी समजून घोड्याला मसाज करायचे तेल पिल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला. यासीन रऊफ डांगे (वय ३ ) असे त्या लहान मुलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील स्कूल मोहल्ला परिसरात यासीनचे घर आहे. शहरापासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रांजणवाडी येथे डांगे यांच्या घरातील लोक बुधवारी रात्री नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घरात एका बाटलीमध्ये घोड्याला मसाज करायचे तेल ठेवण्यात आले होते. बाटलीमध्ये पाणी आहे असे समजून ते तेल यासीन ने पिले. गुरुवारी सकाळी महाबळेश्वर येथील घरी आल्यानंतर यासीनला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्याला वाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने सातारा येथे हलवण्यात आले. मात्र यासीनची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने त्याला पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यावेळी त्याचा मृत्यू झाला.