Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Satara › सातार्‍यात भरदिवसा घरफोडी, साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

सातार्‍यात भरदिवसा घरफोडी, साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

Published On: Aug 04 2018 5:08PM | Last Updated: Aug 04 2018 5:08PMसातारा : प्रतिनिधी

कारंजे (जि. सातारा) येथे शुक्रवारी दुपारी बंद घर फोडून अज्ञातांनी १२ तोळे सोन्यासह रोख ८ हजार रुपये लंपास केले. या घटनेची तक्रार शाहुपूरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र सोनबा शेलार (वय ३९, रा. कारंजे) यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते कुटुंबियांसह कारंजे येथील मिनाक्षी विहार अपार्टमेंटमध्ये राहत होते. शुक्रवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. पुन्‍हा घरी आल्यावर चोरी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

या घटनेनंतर श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळीचा पंचनामा करण्यात आला.