Sun, May 19, 2019 14:10
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › अवकाळी  धुमाकूळ

अवकाळी  धुमाकूळ

Published On: Nov 21 2018 1:03AM | Last Updated: Nov 20 2018 9:25PMसातारा : प्रतिनिधी 

सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरणाचा नूर पालटला होता. भल्या पहाटेपासून आभाळ दाटून आलं होतं. दिवसभर काळवंडलेलं आभाळ कायमच राहिलं. सूर्यदर्शन काही झालंच नाही. रात्री कराड, पाटणसह माणमध्येही या पावसाने झोडपून काढले. मंगळवारीही असेच चित्र राहिले. अगदी पहाटेपासूनच अवकाळीने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. अचानकच ढगांचा कडकडाट सुरू झाला अन् बघता-बघता अवकाळीने थैमान घालायला सुरूवात केली. जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली, सातारा, कोरेगाव, माण, खटाव या तालुक्यात सकाळी सकाळी अवकाळीने हजेरी लावली. सातारा शहरात काहीशा उशीराने दाखल झालेल्या या पावसाने काही काळ पाणीच पाणी केले. जिल्हाभर धुमाकूळ घातलेल्या या पावसाने राडारोडा केला. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. महामार्गालगतचे सेवा रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचून राहिले. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची दैना उडाली. अवकाळीच्या या तर्‍हेवाईकपणामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवला. ‘पुढारी’ टीमने ठिकठिकाणी कॅमेर्‍याबद्ध केलेली ही काही क्षणचित्रे...

लिंबफाटा परिसर

महामार्गालगत लिंब फाटा ते आनेवाडीपर्यंत ठिकठिकाणी सेवा रस्त्यांना अशी जलसमाधी मिळाली होती.

फलटण 

धुमाळवाडी (गिरवी) ता. फलटण येथील पाची ओढा अनेक महिन्यानंतर ओसंडून वाहिला. 

रायगाव फाटा परिसर

दहिवडी  

दहिवडी परिसरातील ओढे धुवाँधार पावसामुळे दुथडी भरून ओसंडून वाहू लागले. 

म्हसवड  

परतीच्या पावसाने धोका दिल्यानंतर अवकाळी पावसाने मात्र म्हसवड परिसरात दैना उडाली. कोरडे पडलेले बंधारे मंगळवारी धुवॉधार पावसाने ओसंडून वाहिले.