Wed, Apr 24, 2019 02:03होमपेज › Satara › सातारा : कराडात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत 

सातारा : कराडात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत(व्हिडिओ) 

Published On: May 27 2018 6:50PM | Last Updated: May 27 2018 8:56PMकराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कृष्णा नाका परिसरात कॉसमॉस बँक परिसरात कराड-विटा मार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचबरोबर भाजी मंडईतही विक्रेते, व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत कराडसह परिसरात पावसाची चिन्हे नव्हती. मात्र, साडेचारनंतर अचानकपणे वातावरण बदलले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे करा -विटा मार्गावर वृक्ष कोसळला. त्यामुळे जवळपास अर्धा तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शिवसेनेचे शशिकांत हापसे यांच्यासह त्यांचे सहकारी पडलेला वृक्ष हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. कराड शहर व परिसरातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता.

Tags :  satara district karad taluka, rain