Tue, Jan 22, 2019 18:35होमपेज › Satara › सातारा : हॉकर्स संघटनेचा कराड नगरपालिकेत ठिय्या(Video)

सातारा : हॉकर्स संघटनेचा कराड नगरपालिकेत ठिय्या(Video)

Published On: Jul 04 2018 2:01PM | Last Updated: Jul 04 2018 2:01PMकराड : प्रतिनिधी 

नगरपालिकेने राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेविरुद्ध हॉकर्स संघटनेने कराड नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी कराड - विटा मार्गावरील कृष्णा नाका ते कोल्हापूर नाका या दरम्यान अतिक्रमण विरोधी मोहिम राबवत 20 हून अधिक अतिक्रमणे हटवली होती. यामुळे हॉकर्स संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) ठिय्या आंदोलन सुरू केले. शुक्रवारी बैठक होणार असली तरी तीन दिवस व्यवसाय बंद राहिल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र त्यानंतरही पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा दावा हॉकर्स संघटनेकडून करण्यात आला आहे.

नगरपालिका आवारात  साडेअकराच्या सुमारास मुख्याधिकारी आले. त्यानंतर ते एक ते दोन मिनिटातच पालिका आवारातून बाहेर निघून गेले. आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे आम्ही निर्णय होत नाही, तोपर्यंत दररोज पालिकेत येऊन ठिय्या मारणार असल्याचे हाँकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वास्तविक मुख्याधिकाऱ्यांनी किमान आमचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते, असे सांगत हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड नगरपालिकेकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा दावा करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हॉकर्स संघटनेच्या या आंदोलनात जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर, प्रकाश जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी 11 वाजता हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी नगरपालिकेत गेले होते.