Wed, Jun 26, 2019 11:33होमपेज › Satara › लग्‍नपत्रिका वाटणारा नवरदेव अपघातात ठार

लग्‍नपत्रिका वाटणारा नवरदेव अपघातात ठार

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:04AMलिंब : वार्ताहर

स्वत:च्याच लग्‍नाची लग्‍नपत्रिका वाटून परत घरी निघालेल्या शेखर संदेश शेडगे (वय 28, रा. तडवळे, ता. कोरेगाव) याचा अपघातात मृत्यू झाला. मालगाव-न्हाळेवाडी रस्त्यावर बुधवारी रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शेखर शेडगे याचे लग्‍न ठरले होते. दि. 25 मार्चला हा विवाह सोहळा पार पडणार होता. लग्‍नासाठी अवघे दहा दिवस उरल्यामुळे लग्‍नघरी धांदल उडाली होती. पत्रिका वाटण्याचे काम स्वत: शेखरही करत होता. बुधवारी तो जांब किकली परिसरात पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवरून गेला होता. तेथून परत येत असताना मालगाव-न्हाळेवाडीदरम्यान त्याची दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात शेखरचा मृत्यू झाला. लग्‍नाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी उरला असताना एका नवरदेवाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू सार्‍यांनाच चटका लावून गेला. मालगाव परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. दरम्यान, घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून याबाबतची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. लिंबजवळ दुपारी झालेल्या अपघातात विद्यार्थिनी ठार झाल्यानंतर एका नवरदेवाचाही अपघातात मृत्यू झाल्याने समाजमन हळहळले आहे.