Mon, Apr 22, 2019 04:04होमपेज › Satara › ७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर

७७ ग्रा.पं.तींच्या निवडणुका जाहीर

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:26PMतारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून दि. 25 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.  जिल्ह्यातील 427 ग्रामपंचायतींच्या 804 रिक्‍त जागांसाठीही पोट निवडणूक होणार आहे.

मार्च ते मे महिन्यादरम्यान मुदत संपणार्‍या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ही निवडणुकीत थेट सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसाठी तसेच रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.   या निवडणुकीची नोटीस संबंधित तहसीलदार दि. 25 रोजी काढणार आहेत. जिल्ह्यात 217 ग्रामपंचायतींची दोन महिन्यांपूर्वीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा धुरळा बसला नाही तोच पुन्हा 77 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. सातारा तालुक्यातील वडगाव, धावडशी, कारी, लुमणेखोल; कोरेगाव तालुक्यातील मुगाव, शिरढोण, भाटमवाडी; जावली तालुक्यातील सांगवी तर्फे मेढा, आगलावेवाडी, आसणी, बिभवी, गांजे, गोंदेमाळ, ओखवडी, पानस तळोशी, वाळंजवाडी, ऐकीव, भोगवली तर्फ मेढा, कावडी, कोळघर, तेटली, भाटघर, केळघर तर्फ सोळशी, वाघदरे; कराड तालुक्यातील बानुगडेवाडी, भोसलेवाडी, गोसावेवाडी, हेळगाव, कांबीरवाडी, पिंपरी, रेठरे बु॥, सयापूर, शेळकेवाडी (येवती), टेंभू, येणपे, यशवंतनगर, येवती; पाटण तालुक्यातील कुसरुंड, बेलवडे खुर्द, शितपवडी, चौगुलेवाडी, गावडेवाडी, उधवणे, रुवले, जिंती, गमेवाडी, गुंजाळी, किल्‍लेमोरगिरी; वाई तालुक्यातील कोंढावळे, विठ्ठलवाडी, खडकी, वडोली, चिंधवली, ओहळी; महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्वत तर्फ वाघावळे, देवळी, मांघर, अवकज्ञाळी, पारुट, गुरेघर, रेणोशी, निवळी, आरव, लामज, मोरणी, सालोशी, वलवण, आचली, उचाट; खटाव तालुक्यातील फडतरवाडी (बुध), पांगारखेळ, उंबरमळे, बुध, काटेवाडी तर माण तालुक्यातील बिंजवडी या गावांचा समावेश आहे.