होमपेज › Satara › महिलेला जेवण पडले एक लाखाचे

महिलेला जेवण पडले एक लाखाचे

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

व्यंकटपुरा पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये आयोजित कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेलेल्या शाहूपुरी येथील एका महिलेचे  1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी चोरुन नेले. शाहूपुरी येथील झेडपी शाळेजवळ चंद्रप्रभा मधुकर पवार या राहण्यास असून त्या शुक्रवारी दुपारी व्यंकटपुरा पेठेत आयोजित एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. याठिकाणी जेवण करत असतानाच अज्ञातांनी त्यांच्याकडे असणारी 4 तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ चोरुन नेली. याप्रकरणी पवार यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.