Thu, Sep 20, 2018 03:56होमपेज › Satara › भाविकांच्या अलोट गर्दीत घाटाई देवीची यात्रा (व्‍हिडिओ)

भाविकांच्या अलोट गर्दीत घाटाई देवीची यात्रा (व्‍हिडिओ)

Published On: Jan 06 2018 7:38PM | Last Updated: Jan 06 2018 8:01PM

बुकमार्क करा
परळी : वार्ताहर   

कास पठारावरील घाटाई देवीची यात्रा भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडली.

निसर्गरम्य डोंगर माथ्यावर स्वयंभू निर्माण झालेली घाटाई माता या देवीच्या यात्रेला दरवर्षीप्रमाणे परळी, ठोसेघर, महाबळेश्‍वर, मेढा, बामणोली, तारळे, पाटण, वाई भागासह सातारा, मुंबई, पुणे शहरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. भाविकांनी शुक्रवारी दुपारपासूनच देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी 8 वाजल्यापासून कासाणी, रोहोट, सह्याद्रीनगर, पाटेघर, सायळी, वडगाव, नित्रळ आदी गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या ढोल ताशांसह लेझीम पथकाच्या गजरात देवीच्या भेटीसाठी दाखल होवू लागल्या. यात्रेला रात्री 11 वाजता  भव्य स्वरूप प्राप्त झाले. 12 वाजता देवीची महाआरती होवून ढोल ताशांच्या  गजरात अलोट भाविकांच्या गर्दीत देवीचा छबीना पार पडला. 

घाटाई देवीच्या दर्शनासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले,  शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद कदम, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, सातारा तालुका पोलिस निरिक्षक प्रदिप जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी कारखानीस, परळी वैद्यकीय अधिकारी सचिन यादव, गट विस्तार अधिकारी राक्षे,  माजी जि. प.  सदस्य राजू भोसले, जि. प सदस्या कमलताई जाधव, पं. स.सदस्या विद्या देवरे, भाजपा गटनेते धनजंय जांभळे, अशोक शेडगे, प्रकाश खरात आदींनी हजेरी लावली होती.  शनिवारी दुपारी 2 वाजता यात्रेची सागंता झाली.