Tue, Apr 23, 2019 18:02होमपेज › Satara › नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन(Video)

नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन(Video)

Published On: Aug 04 2018 12:04PM | Last Updated: Aug 04 2018 12:04PMसातारा: प्रतिनिधी

साताऱ्यातील नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून ज्ञानेश्वर शेलार या नगरपालिकेकडे कचरा उचणाऱ्या घंटा गाडीचा मालक- चालक यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री ही घटना घडली असून सिव्हिल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

साताऱ्यातील सदरबाझार या भागातील नगरसेवक विशाल जाधव हे ज्ञानेश्वर शेलार यांना वारंवार त्रास देत होते.  नगरसेवक जाधव  त्यांना वारंवार अचानक कामावर बोलावत असे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांना शेलार यांना अचानक काम बंद करण्यास सांगितले. असे आरोप उपचार घेत असलेल्या शेलरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर नगरसेवकांवर तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या दत्तात्रय शेलार ची प्रकृती चिंताजनक आहे.