Sun, May 26, 2019 09:45होमपेज › Satara › गुंड दत्ता जाधव टोळीला आणखी एक मोक्का

गुंड दत्ता जाधव टोळीला आणखी एक मोक्का

Published On: Jun 19 2018 12:48PM | Last Updated: Jun 19 2018 12:48PMसातारा : प्रतिनिधी

प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव या टोळीला सातारा पोलिसांनी आणखी एक मोक्का लावला आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. भुईंज येथील साखर कारखान्याच्या भंगारप्रकरणी पुणे व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हर दाखवून सुमारे २६ लाख रुपये जबरदस्तीने उकळले असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधीक माहिती अशी, डिसेंबर 2017 मध्ये भुईंज येथील साखर कारखान्यावर भंगाराचे टेंडर निघाले होते. पुणे येथील दोन व्यावसायिक हे भंगार पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी शुकराज घाडगेस तीन-चार जणांनी या दोन्ही व्यापाऱ्यांना गुंड दत्ता जाधव याची ओळख करून दिली. आपल्याशिवाय कोणाचे टेंडर मंजूर होणार नसल्याचे सांगून टेंडर कितीला घायचे अशी दत्‍ताने त्या व्यापाऱ्यांकडे विचारणा केली. तुम्‍हला टेंडर पाहिजे असेल तर, त्याबदल्यात दहा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्‍यानंतर दत्ता जाधव याला तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी ६ लाख रुपये दिले. टेंडर मिळल्यानंतर मात्र, दोघांचे टेंडर असल्याचे सांगून त्यावर निम्मा हिस्सा सांगितला. कारखान्यातील भंगार काढत असताना दत्ता जाधव याने दुसरा व्यापारी या भंगाराचे 40 लाख रुपये देत आहे, तुम्‍हाला हे भंगार पाहिजे असेल तर २२ लाख रूपये द्या अशी मागणी केली. व्यापाऱ्यांनीही त्‍याला २२ लाख रूपये दिले.

दरम्यान, दत्ता जाधव याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीच्या माध्यमातून त्याने मारहाण करून अनेक गुन्हे केले आहेत. भुईंज पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करून तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना पाठवला असता पाटीलत्‍यांना त्‍या प्रस्तावाला मंजुरी दिली.