जलधारांच्या वर्षावात बाप्पांचे विसर्जन (Video)

Published On: Sep 13 2019 11:08AM | Last Updated: Sep 13 2019 11:08AM
Responsive image


सातारा : प्रतिनिधी

'गणपती बाप्पा मोरया, 'मंगलमूर्ती मोरया, 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात गुलाल फुलांची उधळण करत वरुण राजाच्या जलधारांच्या वर्षावात शहरातील मुख्य मिरवणूक पार पडली. पहाटेपर्यंत ही मिरवणूक सुरू होती.

सकाळपासूनच सातारा शहारातील मानाचा गणपती समजला जाणारा महागणपती सम्राट, मोतीचौकातील फेटेवाला यासह अन्य मंडळांच्या मिरवणूका सुरू झाल्या. रात्री गणेश भक्तांनी गर्दी केली होती.
दरम्यान, घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी संगमाहुली, वाढे, वर्ये येथील वेण्णा नदी, शहरातील पालिका पोहण्याचा तलाव, प्रतापसिंह शेती शाळा, सदरबझार दगडी शाळा, हुतात्मा स्मारक यासह अन्य ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. शहर पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, सायंकाळी आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. गुजरातमध्ये पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसने सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले!


अकोल्यात ३० नवे पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ७५६ 


कोरोना लसीबाबत 'एम्स'चा मोठा खुलासा! 


केवळ स्पर्शाने कोरोना पसरत नाही; हवाई वाहतूक मंत्रालयाचा दावा


सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई योग्यच!


कोरोना रुग्ण संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर; इटलीला मागे टाकले


सांगली : पलूसमध्ये आणखी एका वृद्धेला कोरोना


हिरण्यकेशीला पाणी आल्याने रामतीर्थ धबधबा प्रवाहीत


'अनलॉक'मुळे भारतात होऊ शकतो कोरोनाचा मोठा उद्रेक : WHO


सातारा : पोहताना दमलेल्‍या मित्राला वाचवताना नदीत बुडून युवकाचा मृत्‍यू