Sun, May 26, 2019 01:35होमपेज › Satara › वडगावमधील फ्युज बॉक्स बदलले

वडगावमधील फ्युज बॉक्स बदलले

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 8:33PMशेणोली : वार्ताहर

वडगांव हवेली वीज कार्यालय गलथान कारभारा मुळे नेहमीच चर्चेत असते. अपुरा कर्मचारी वर्ग व वीजपुरवठयातील वारंवार बिघाडाने ग्रामस्थ व शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. पावसाळ्यात होणारे संभाव्य वीज बिघाड अथवा हानी टाळण्यासाठी वीज कार्यालयाने उपाय योजना करणे गरजेचे असते. वीज कार्यालयाच्या बेपर्वाईने एका तरुण युवकाच्या मृत्युनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

वीज कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गत तीन वर्षात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत दै. पुढारीने वडगांव वीज कार्यालय अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल करीत वीज कार्यालयाच्या गलथान कारभारा बाबत आवाज उठवला होता. दै. पुढारीच्या वृताची दखल घेत वडगांव वीज कार्यालयाने वडगांव हवेली बसस्थानक परीसरात लोकवस्तीत असणारा धोकादायक फ्युज बॉक्सची तात्काळ दूरूस्ती करून नवीन फ्युज बॉक्स बसविण्यात आला.