Mon, Jun 24, 2019 17:44होमपेज › Satara › पाचगणीच्या सहाय्यक फौजदार विरोधात फसवणुकीची तक्रार

पाचगणीच्या सहाय्यक फौजदार विरोधात फसवणुकीची तक्रार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर : वार्ताहर 

अवकाळी, ता. महाबळेश्‍वर येथे आर्या कॉटेजमध्ये झालेल्या चोरी संदर्भात  फिर्यादीनुसार तक्रार दाखल न करता पोलिसांना सोयीस्कर होईल अशी तक्रार घेवून फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे केली असल्याचे तक्रारदार शंकर ढेबे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

यावेळी ते म्हणाले, आर्या कॉटेज चालवण्यासाठी घेतले होते. तालुक्यात हॉटेल, लॉजला परवाना देण्यास स्थगिती असल्याने मूळ मालकांकडेही परवाना नाही. या कॉटेजमधून केअर टेकर म्हाडसे याने सहा टीव्ही, तीन सेटप बॉक्स, गॅस शेगडी, सिलेंडर व रोख 22 हजार रूपये असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी फिर्याद द्यायला गेल्यानंतर कुलकर्णी याने कॉटेजला परवाना नसल्याने अडचणीत येण्याची भीती दाखवून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. 28 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी अधिकृत तक्रार दाखल केली नव्हती. कुलकर्णी याने कॉटेजमधील चोरी तुम्हीच घडवून आणली तुम्हालाच अटक करावी लागेल असा दम भरला. यावेळी स्व:च तपास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार म्हडसे यांच्या जवळच्या माणसांचा शोध घेत तपास केला. त्यानंतर सपोनि तृप्‍ती सोनावणे यांना माहिती दिली. त्यानंतर 12 ऑक्टोबरला कुलकर्णी याने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांसोबत तपास केल्यानंतर म्हाडसे याला अंबरनाथ येथून अटक केली.. त्याच्याकडून 3 टीव्ही व 3 सेटप बॉक्स जप्‍त केले आहेत. म्हाडसेवर तक्रार दाखल करून गेलेली रक्‍कम व मुद्देमाल चोरी झाल्याचा उल्‍लेख करावा. या चोरीच्या गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा, अशी मागणी ढेबे यांनी केली.