Wed, Nov 21, 2018 03:43होमपेज › Satara › पीडित कुटुंबाला माजी मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

पीडित कुटुंबाला माजी मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात

Published On: Sep 01 2018 2:28PM | Last Updated: Sep 01 2018 2:28PMउंडाळे : प्रतिनिधी 

येणपे (जि. सातारा) परिसरातील महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेचा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर आमदार चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच केंद्र सरकारच्या निर्भया योजनेसह राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

काँग्रेसचे विधानपरिषद आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दुपारी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. 

दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कराडचे पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर हे गेल्या चार दिवसांपासून परिसरात ठाण मांडून बसले आहेत.