Wed, Feb 20, 2019 19:05होमपेज › Satara › विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करा

विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करा

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:51PMपाटण : प्रतिनिधी

पाटणमध्ये सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या ठिय्या आंदोलनास चौथ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी सर्व समाजातील विद्यार्थीनींच्या हस्ते गावोगावी ध्वजारोहण करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी पाटणमध्ये 9 ऑगस्टपासून मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रविवारी चौथ्या दिवशी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. तसेच पाटणमधील वकील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा देण्यात आला. तसेच आंदोलनावेळी ज्या बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्या केसेस मोफत चालवण्याची ग्वाहीही वकील संघटनेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवार, 13 ऑगस्टला मराठा बांधव आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. तरी  यावेळी तालुक्यातील मराठा बांधव, भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थीनीनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्यदिनी ठराव करण्याचे ग्रामपंचायतींना आवाहन

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी कराडसह राज्यभर मराठा बांधवांचा लढा सुरू आहे. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांची शासनाने त्वरित पूर्तता व्हावी, म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन कराड तालुका मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.