Wed, May 27, 2020 07:29होमपेज › Satara › अंबवडेत आली पहिल्यांदाच एस.टी.

अंबवडेत आली पहिल्यांदाच एस.टी.

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 8:42PMकराड : प्रतिनिधी

कराडपासून 22 किलोमीटरवर कोळेजवळ असलेल्या अंबवडे गावाला आतापर्यंत एस.टी.च आली नव्हती. एस.टी. नसल्याने ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.  ये-जा करण्यासाठी कोळे अथवा कोळेवाडीला जावे लागायचे. त्यामुळे सर्वांना नाहक त्रास सोसावा लागायचा. गावात एसटी सुरू व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी मागणी केली. आ. चव्हाण यांनीही यात गांभीर्याने लक्ष घालत महामंडळाकडे आग्रह धरल्यामुळे गावात एस. टी. सुरू झाली.

अंबवडेला कराड आगारातून दररोज तांबवे-साजूरमार्गे एसटी येणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.  नुकतेच सुरू झालेल्या एसटीचे अंबवडे येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्याच आले. यावेळी आ. चव्हाण म्हणाले, अंबवडेला एसटी सुरू करण्याची मागणी माझ्याकडे आल्यानंतर मी यामागील अधिक तपशील जाणून घेतला. त्याकामी बारकाईने लक्ष दिले. एसटी सुरू झाल्यामुळे आजमितीला 25 विद्यार्थी व ग्रामस्थांची प्रवासाची अडचण दूर झाली आहे. आतापर्यंत या विभागातील विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे सुरु आहेत. नव्याने प्रस्तावित कामांच्या मंजुरीसाठी मी प्रयत्नशील आहे. 

यावेळी सरपंच संतोष ढेरे यांनी स्वागत केले. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जे. के. पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, पं.स. सदस्य उत्तमराव पाटील, तारुखचे सरपंच दत्तात्रय पुजारी, शिंदेवाडीचे सरपंच निवासराव शिंदे, घारेवाडीचे माजी सरपंच तानाजी घारे, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. मस्के, माजी सरपंच सुधीर शेवाळे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.