Sat, Feb 23, 2019 14:14



होमपेज › Satara › सातारा : वाठार निंबाळकर येथे भीषण आग; वाहनांसह लाकूड कारखाना भस्मसात(Video)

सातारा : वाठार निंबाळकर येथे भीषण आग; वाहनांसह लाकूड कारखाना भस्मसात(Video)

Published On: Aug 31 2018 10:05AM | Last Updated: Aug 31 2018 10:30AM



फलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीत लाकूड, पाचट, बायोमास ब्रिकेट, आठ चारचाकी वाहने जळून खाक झाले. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

फलटण ते पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर हद्दीत स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांची आयुर ट्रेडर्स ही कंपनी आहे. त्यात बायोमास ब्रिकेटचा उद्योग आहे. २० एकर जागेत लाकूड, बगैस, प्रेसमड, पाचट, लाकडाचा भुसा, ब्रिकेट आहेत. या जागेतून वीजवाहक तारा गेल्या आहेत. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने ठिणग्या उडून आग लागली. रात्रभर जास्त वारे असल्याने आग वेगाने पसरली. यावेळी तेथे असणारे कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेचा अग्निशमन ही घटनास्थळी आला. मात्र तोपर्यंत आग वेगाने पसरून सर्व जळून खाक झाले. 

या आगीत चार ट्रॅक्टर, दोन ट्रक, एक टेम्पो, टँकर जळून खाक झाले. आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक- निंबाळकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस, काँग्रेस कार्यकर्ते यांनी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर कर्मचारी आणि नागरिकांच्या अथक प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले