होमपेज › Satara › नागठाणे येथे दोन दुकाने जळून खाक

नागठाणे येथे दोन दुकाने जळून खाक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नागठाणे : वार्ताहर

नागठाणे ता.सातारा येथे मध्यरात्री लागलेल्या आगीत दीपक साळुंखे यांचे किराणा मालाचे दुकान व कुमार वेळापुरे यांचे जनरल स्टोअर्स दुकान पूर्णपणे भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलिस करत आहेत.

Tags : fire, shops, nagthane, satara  


  •