Sun, Jul 21, 2019 12:38होमपेज › Satara › सातारा : आवर्डेत जनावरांच्या शेडसह चाऱ्यांच्या गंजींना आग(video)

सातारा : आवर्डेत जनावरांच्या शेडसह चाऱ्यांच्या गंजींना आग(video)

Published On: Jan 26 2018 4:13PM | Last Updated: Jan 26 2018 4:13PMतारळे : वार्ताहर

आवर्डे (ता.पाटण, जि. सातारा) येथील प्रविण जगन्नाथ खामकर यांचे कुशी (गावठाण) शिवारातील जनावरांचे शेड व तीन गंजी शुक्रवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

तसेच या आगीत पाईप, शेतीपयोगी साहित्यही भक्षस्थानी पडले आहे. यात एक बैल जखमी झाला आहे. मात्र शेडमध्ये खेळणारी मुले व सहा जनावरे सुखरूप बाहेर काढण्यात  यश आले आहे. शेड लगतच्या ऊसाची पाचट पेटवताना वाऱ्याच्या झुळुकेने आग पसरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यामध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.