Thu, Sep 19, 2019 03:29होमपेज › Satara › सातारा : पिंपोडे बुद्रुकला शॉर्टसर्किटने आग, घर जळून खाक (व्हिडिओ)

सातारा : पिंपोडे बुद्रुकला शॉर्टसर्किटने आग, घर जळून खाक (व्हिडिओ)

Published On: Dec 22 2017 1:30PM | Last Updated: Dec 22 2017 1:30PM

बुकमार्क करा

पिंपोडे बुद्रुक: वार्ताहर 

पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेतील जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी नऊ  वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला.  या आगीत जवळपास सर्व घर जळाले आहे. या आगीमुळे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. 

विनायक जगन्नाथ महाजन यांच्या पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेतील    जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी आग लागली. गावातील जवळपास शंभर ते दीडशे युवकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर  किसनवीर साखर कारखाना, शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज, फलटण नगरपरिषद यांचे अग्निशामक बंब आल्याने आग आटोक्यात आणायला मोठी मदत झाली.