Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Satara › फलटण : कॉस्मेटिकसच्या दुकानाला भीषण आग

फलटण : कॉस्मेटिकसच्या दुकानाला भीषण आग

Published On: Apr 15 2018 10:52AM | Last Updated: Apr 15 2018 10:52AMफलटण(जि. सातारा) : प्रतिनिधी

फलटण-शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या दुकानाला शनीवारी (दि. १४) मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिंगणापूर रोड येथील साई कॉस्मेटिकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग लक्षात येताच तेथील घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर  फलटण नगरपरिषदचे अग्निशमन दल दाखल झाले. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्‍याने पहाटे 5 पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. 

साई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजलाही आग लागली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा न केल्याने नक्की नुकसान किती झाले हे समजले नाही.

Tags : satara district, phaltan taluka, fire, cosmetic shop