Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Satara › सातारा : वाईत दोन दुकाने जळून खाक

सातारा : वाईत दोन दुकाने जळून खाक

Published On: May 27 2018 12:21PM | Last Updated: May 27 2018 12:20PMवाई : प्रतिनिधी

वाई शहराच्या मध्यभागी असलेले नवजीवन हॉटेल आणि गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्सया दोन दुकानांना काल रात्री शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये दोन्ही दुकानातील सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीने वाई शहरात एकच खळबळ मजली आहे. 

वाई शहरातील नवजीवन हे मिसळसाठी प्रसिद्ध हॉटेल होते. दुसरे गुरुदत्त आईस्क्रीम ॲण्ड स्नॅक्स अशी लगतच दोन्ही दुकान जवळजवळ होती. आगीमुळे दोन्ही दुकाने पूर्णपणे बेचिराख झाली असून खूप नुकसान झाले आहे.

आगिने रुद्ररूप धारण करतात वाई नगरपालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग साधारण दोन ते तीन तासानंतर आटोक्यात आली. परंतु ही आग नक्की कोणत्या दुकानातून लागली याबाबत सगळे साशंक आहेत. सध्या वाई शहरामध्ये आग लागण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. शॉट सर्किटमुळेच आग लागण्याचे प्रमाण जास्त आहे.