Wed, Sep 19, 2018 22:04होमपेज › Satara › वडूज येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान

वडूज येथे वणव्यामुळे लाखोंचे नुकसान

Published On: Feb 15 2018 10:29AM | Last Updated: Feb 15 2018 11:11AMवडूज : वार्ताहर

येथे मध्यरात्री लागलेल्या वणव्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री अचानक लागलेल्या वणव्याने दहिवडी रस्‍त्याशेजारी असणारी फळबाग आगीत जळून खाक झाली.

वाचा : खासदार उदयनराजेंची ‘व्हॅलेंटाईन’ अदा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडूज येथील दादासाहेब जोतिराम गोडसे यांच्या फळबागेला बुधवारी मध्यरात्री आग लागली. यात लाखों रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये आंब्याची १८० झाडे, तर चिकूची ३० झाडे जळून खाक झाली आहेत. रात्री आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

वाचा : लोकसभेच्या हॅट्ट्रिकसाठी उदयनराजे मैदानात