Tue, Sep 25, 2018 12:50



होमपेज › Satara › अखेर स्वाभिमानीने वृक्षतोड रोखली

अखेर स्वाभिमानीने वृक्षतोड रोखली

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 10:31PM

बुकमार्क करा




कराड : प्रतिनिधी 

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड-चिपळूण या दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सध्यस्थितीत सुरू आहे. मात्र, या कामासाठी सुरू असणार्‍या वृक्षतोडीबाबत माहिती लपवली जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नवारस्ता (ता. पाटण) परिसरात शनिवारी दुपारी वृक्षतोड बंद पाडली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, पाटण तालुकाध्यक्ष कृष्णकांत क्षीरसागर, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अमर कदम, योगेश झांब्रे यांच्यासह स्थानिक शेतकर्‍यांनी हे आंदोलन केले. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबतचे निवेदन कोल्हापूर येथील महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना दिले होते. झाडे तोडणार्‍या कंपनीकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, असा दावा करत वृक्षतोडीची सर्व माहिती देण्याची मागणी नलवडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी केली होती. या मागणीनंतरही वृक्ष तोडीबाबत कोणतीही ठोस माहिती न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंदोलन केल्याचे सचिन नलवडे यांनी सांगितले आहे.